Home Accident News घातवार: विजेच्या धक्क्याने मायलेकीसह तिघांचा मृत्यू

घातवार: विजेच्या धक्क्याने मायलेकीसह तिघांचा मृत्यू

Ahmednagar News:  धुणे वाळू घालत असताना  विजेच्या तारेचा शॉक (electric Shock) लागून तीन मृत्यू.

hree killed, including Mileki, due to electric Shock

 

नेवासा: नेवासा तालुक्यातील सोनई गावाच्या दृष्टीने काल बुधवार घातवार ठरला. वेगवगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात विजेच्या तारेचा शॉक लागून तीन मृत्यू झालेले आहेत. एका युवतीने आत्महत्या केली. एका महिलेने विष प्राशन केल्याने उपचारापूर्वीचा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विविध घटनांनी सोनई परिसर हादरून गेला आहे.

सोनईतील बालाजी नगर परिसरात निर्मला रमेश कुसळकर (वय 42), निकिता अमोल ननवरे (वय 22), धुणे वाळू घालत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून या आई व मुलगी एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू पावल्या आहेत.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

दुसरी घटना शिंगणापूर रोडवर स्टेट बँके जवळ टेलिफोन वायरचे काम करत असताना बाळासाहेब त्रिंबक खोसे (वय 42) हे शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Three killed, including Mileki, due to electric Shock

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here