Home औरंगाबाद तीन विद्यार्थिनींसोबत चालकाचे अश्लील चाळे

तीन विद्यार्थिनींसोबत चालकाचे अश्लील चाळे

Indecent: मुलींच्या पालकांनी सोमवारी दबा धरून व्हॅनमध्ये रिक्षाचालक शिरल्यानंतर त्यास पकडले. जमलेल्या नागरिकांनी रिक्षाचालकासह व्हॅन चालकास चोप.

Indecent chale of driver with three students

औरंगाबाद : शाळेत दुसरीच्या वर्गात असलेल्या तीन मुलींना व्हॅनमध्ये बसविल्यानंतर एक रिक्षाचालक येऊन त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत होता. तीन वेळा हा प्रकार घडल्यानंतर मुलींच्या पालकांनी सोमवारी दबा धरून व्हॅनमध्ये रिक्षाचालक शिरल्यानंतर त्यास पकडले. जमलेल्या नागरिकांनी रिक्षाचालकासह व्हॅन चालकास चोप देत सिडको पोलिसांच्या हवाली केले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार दोघांच्या विरोधात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.

रिक्षाचालक विकास विठ्ठलराव बनकर (वय ३८, रा. आंबेडकरनगर), व्हॅनचालक राजू मोहन रुपेकर (रा. पिसादेवी) हे आरोपी आहेत. शहरातील एन. ९ परिसरातील सोनामाता बालक मंदिर शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ८ ते ९ वर्षांच्या तीन मुली एका व्हॅनमधून दररोज शाळेत येत होत्या.

शाळा सुटल्यानंतर या मुली व्हॅनमध्ये येऊन बसल्यानंतरच व्हॅनचालक रूपेकर ह रिक्षाचालक बनकर यास बोलावून घेत असे. ७ डिसेंबर रोजी बनकर याने तिन्ही मुलींशी अश्लील चाळे केले त्यानंतर मुलींना तुम्ही ही घटना घरी सांगितल्यास आई-वडिलांना तुम्ही शाळेच्या बाजूच्या नाल्यात हातपाय धुतात व बैलाच्या मटनाची बिर्याण खाता, असे सांगण्याची धमकी दिली मुलींनी याविषयी व्हॅनचालक रूपेकस यास सांगितले असता त्याने दुर्लक्ष् केले. पहिल्या दिवशी मुलीने घरी सांगितल्यानंतर आईने दुर्लक्ष केले त्यानंतर १० डिसेंबर रोजीही तसाच प्रकार बनकरने केला. त्यादिवशी घरी सांगितल्यानंतर १२ डिसेंबर रोजी दोन मुलींचे पालक लपून बसले. नराधम बनकरला इशारा करून रूपेकर निघून गेला. बनकर हा व्हॅनमध्ये बसून मुलींकडे जातानाच मुलींच्य पालकांनी त्यास पकडून विचारपूर केली. जमलेल्या नागरिकांनी दोन्ही चालकांना बेदम मारहाण करीत सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Indecent chale of driver with three students

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here