Home जळगाव श्रावणी सोमवारी दुर्घटना. ..रामेश्वर तीर्थावर एकाच कुटुंबातील तिघे बुडाले

श्रावणी सोमवारी दुर्घटना. ..रामेश्वर तीर्थावर एकाच कुटुंबातील तिघे बुडाले

रामेश्वर या तीर्थक्षेत्रावर कावड यात्रा घेऊन आलेल्या एरंडोल तालुक्यातील तरुणांच्या गटातील तीनजण तापी नदीत बुडाले.

Three members of the same family drowned at Rameshwar Tirtha

जळगाव: श्रावण सोमवारनिमित्त जळगाव तालुक्यातील रामेश्वर या तीर्थक्षेत्रावर कावड यात्रा घेऊन आलेल्या एरंडोल तालुक्यातील तरुणांच्या गटातील तीनजण तापी नदीत बुडाले. यापैकी दोनजणांचे मृतदेह सापडले असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे. हे तिघेही जण चुलत भाऊ आहेत.

पीयूष रवी शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३) व अक्षय प्रवीण शिंपी (२२) अशी या तिघांची नावे आहेत. कावड यात्रा घेऊन आल्यानंतर ते तिघे जण पोहण्यासाठी तापी नदीत उतरले. त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व तिघेही जण पाण्यात बुडाले.

पहिल्या श्रावण सोमवारी घडलेल्या दुर्घटनेने एकाच कुटुंबातील तीन तरुण पाण्यात बुडाले आहेत. या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध एसडीआरएफचे पथक घेत आहेत. जळगाव तालुक्यातील रामेश्वर तीर्थावर सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

श्रावण सोमवारनिमित्त एरंडोल शहरातील ५० तरुणांचा एक गट रामेश्वर तीर्थावर कावडयात्रा घेऊन दर्शनासाठी गेला होता. गिराणा, तापी आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावर रामेश्वर महादेव मदिर आहे. येथेच हे तरुण गेले होते. येथे दर्शन घेऊन दुपारी साडेतीन वाजता पियुष रवी शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३), अक्षय प्रवीण शिंपी (२२) पोहण्यासाठी तापी नदीत उतरले. त्यावेळी पाण्याचा अंदाज आला न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि धुळे येथील एसडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यानंतर शोध सुरु झाला. यात दोघांचे मृतदेह हाती लागले.

Web Title: Three members of the same family drowned at Rameshwar Tirtha

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here