Home अहमदनगर अहमदनगर: गोळीबाराचा थरार! सहा गोळ्या झाडून पिस्तूल केलं रिकामं

अहमदनगर: गोळीबाराचा थरार! सहा गोळ्या झाडून पिस्तूल केलं रिकामं

Ahmednagar News: पाठलाग करीत पिस्तूल मधून सहा गोळ्या झाडल्या.

thrill of shooting The pistol was emptied after firing six bullets

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात शेतीच्या वादातून एक थरारक घटना समोर आली आहे.  श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा या ठिकाणी काल रात्री साडे सातच्या सुमारास मढेवडगाव चिंभळा रस्त्यावरील हॉटेल पन्हाळा येथे संतोष ऊर्फ लाला बबन गायकवाड ( वय ३० वर्षे रा. चिंभळा) यांच्यावर जयदीप दत्तात्रय सुरमकर (रा. चिंभळा) याने पिस्तूल मधून सहा गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या लाला गायकवाड यांना तातडीने पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात सुनिल राजू गायकवाड यांनी फिर्याद दिली असूनं आरोपीवर आर्म्स ऍक्ट सह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी चिंभळा पारिसरातील पन्हाळा हॉटेलवर शेत जमिनीच्या वादाबाबत चर्चा चालू असताना आरोपी जयदीप सुरमकर याने पिस्तूल काढून लाला गायकवाड याच्यावर गोळीबार केला. लाला गायकवाड यांच्यावर गोळीबार होताच ते हॉटेलच्या तारेच्या कंपाऊंडवरून जिवाच्या भीतीने मढेवडगावच्या दिशेने पळत सुटला. यावेळी जयदीप सुरुमकर याने लाला यांचा पाठलाग करून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर, कानावर, डाव्या हाताच्या दंडावर, हाताच्या पंजावर उजव्या पायाच्या खुब्यावर तसेच गुप्त भागावर गोळ्या झाडल्या. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांना खबर मिळताच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी गेला होता.

रात्री उशिरा नगर येथील फॉरेन्सिक लॅब पथक, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, बेलवंडी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरिक्षक प्रकाश चाटे, मोहन गाजरे, समीर अभंग, रोहिदास झुंजार घटनास्थळी येऊन तपास करत होते. अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व उपनिरिक्षक मोहन गाजरे करत आहेत. आरोपी पसार झाला आहे.  

Web Title: thrill of shooting The pistol was emptied after firing six bullets

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here