राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे
Breaking News | Thunderstorm accompanied with lightning, light rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa, Madhya Maharashtra and Marathwada.
Maharashtra Weather Update: देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून (21 ऑक्टोबर) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली. मोठी पडझड झाली. झालेल्या नुकसानातून वर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.
21 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,लातूर, नांदेड, परभणी ,हिंगोली ,वाशिम ,अकोला, यवतमाळ ,चंद्रपूर, गडचिरोली जिल्हाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .
22 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर,धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा- यलो अलर्ट
23 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, नांदेड, वाशिम ,यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर ,गोंदिया, गडचिरोली – यलो अलर्ट
24 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली
25 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाचे येलो अलर्ट
Breaking News: Thunderstorm accompanied with lightning, light rainfall