लग्नावेळी सासरच्यांनी लपवली एक गोष्ट, जावयाने लाऊन घेतला गळफास
Crime News | Suicide Case: सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवलं आहे.(ended life) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील भोकरगाव शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. आमच्या मुलीला नांदवत का नाही? असा प्रश्न विचारत सासरच्या नातेवाईकांनी जावयाला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे जावयाने गळफास लावून घेतला आहे.
कार्तिक नारायण लंबे असं गळफास लावून घेतलेल्या जावयाचे नाव आहे. कार्तिक यांचे भाऊ गणेश लांबे यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी कार्तिक यांची पत्नी रुचा, वडील साईनाथ सोनवणे, आई, भाऊ पवनस सोनवणे, मामा बंडू पवार, विजय पवार, आणि बाबासाहेब त्रिंबक सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कार्तिक लंबे यांचं लग्न 3 एप्रिल 2024 ला वैजापूर तालुक्यातील भादलीच्या रुचा साईनाथ सोनवणेसोबत झालं होतं, पण रुचा गतीमंद असल्याचं लंबे कुटुंबाच्या लक्षात आलं, त्यानंतर रुचाला तिच्या माहेरी पाठवलं गेलं. 25 डिसेंबरला सकाळी 9 वाजता रुचाचे वडील, आई, मामा यांनी भोकरगावला आले आणि त्यांनी कार्तिक यांना धमकावले आणि शिवीगाळ केली. तसंच मुलीला नांदवत का नाही? अशी विचारणा केल्याची तक्रार लंबे कुटुंबाने पोलिसांकडे केली.
लंबे आणि सोनवणे कुटुंबातला वाद पोलीस स्टेशनला गेल्यानंतर गावातल्या प्रतिष्ठीत मंडळींनी दोन्ही कुटुंबाची समजूत काढली. रुचीवर मानसिक रुग्णालयात उपचार करण्याचं आश्वासन लंबे कुटुंबाने दिलं, त्यानंतर हा वाद मिटला. यानंतर 28 डिसेंबरला रुचाच्या माहेरच्यांनी कार्तिकच्या काकांना फोन केला आणि मुलीला घेऊन का जात नाही? अशी विचारणा केली. यानंतर घाबरलेल्या कार्तिकने गळफास लावून घेतला, असं कार्तिकच्या भावाने फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: time of marriage, the father-in-law hid a thing, the son-in-law hanged himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News