Home अहमदनगर सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने घेतले विष, विष घेण्यापूर्वी एक चिठ्ठी

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने घेतले विष, विष घेण्यापूर्वी एक चिठ्ठी

Ahmednagar News:  एका तरुणाने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना.

Tired of the moneylender's questioning, the young man took poison trying Suicide

श्रीरामपूर:  श्रीरामपूर शहरातील एका तरुणाने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणाने विष घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळे श्रीरामपुरात सावकारी करणारांचे धाबे दणाणले आहेत.

तेजस बोर्‍हाडे असे विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव असून या तरुणाने शहरातील वॉर्ड नं. 7, दळवी वस्ती भागात राहणार्‍या एका सावकाराकडून नोव्हेंबर 2021 मध्ये 15 टक्के व्याजदराने 1 लाख 50 हजार रुपये घेतले होते. या रकमेवर ऑक्टोबर 2022 पर्यंत त्याने सावकारास व्याजही दिले. परंतु सदरची व्याजाने घेतलेली मूळ रक्कम तेजस परत करू शकला नाही. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सावकाराने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. हा सावकार या तरुणास शारीरिक व मानसिक त्रास देत आहे. या अगोदरही शहरातील भगतसिंग चौक व शिवाजी चौक या दोन्ही ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे तरूण आणून शिवीगाळ करून या तरुणास मारहाण केली होती. तसेच तेजसच्या मुलाला व कुटुंबाला जीवे मारण्याचा धमक्या दिल्या जात आहे. ज्या ठिकाणी हा तरुण काम करत होता त्या ठिकाणी जावूनही धिंगाणा करून त्रास दिला.

या तरुणाने घेतलेल्या रकमेच्या दुप्पटहून अधिक रक्कम व्याजाच्या नावाखाली या सावकाराने वसूल केलेली असताना तेजसला नाहक त्रास दिला जात होता. या सावकाराच्या जाचाला कंटाळून त्याने विष प्राशन करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब कुटुंबियांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यास बुधवारी सायंकाळी येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. यात त्रास देणारा सावकाराचे नाव व त्याच्या साथीदारांचा उल्लेख करण्यात आला असून सविस्तर कथन असलेली सदरची चिठ्ठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावे लिहिली आहे. त्यात मला न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे.

सदरचा सावकार मागील एका सावकारकीच्या (व्यापारी आत्महत्या प्रयत्न) प्रकरणात अडकलेला असून त्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

या तरूणावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तो शुद्धीवर आल्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवून त्यात सावकारीचा संदर्भ आला तर सदरच्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Tired of the moneylender’s questioning, the young man took poison trying Suicide

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here