Home महाराष्ट्र लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले

Crime News: लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट.

live-in partner was Murder and the body was ground into pieces in a mixer

मिरा रोड: मिरा रोडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन, घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य जप्त केले आहेत. मनोज साने असं या 56 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी सानेला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यात मनोज साने (वय 56) आणि मयत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघं राहत होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं.

पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले.  सध्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Web Title: live-in partner was Murder and the body was ground into pieces in a mixer

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here