अकोले :आदिवासी कार्यालयावर हल्ला निंदणीय – पिचड
आदिवासी कार्यालयावर हल्ला निंदणीय – पिचड
अकोले : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेचे काही समाजकंटक पायमली करीत तुडवित असुन गुंड प्रवृतीच्या व विकृत समाजकंटक राज्यघटनेने अधिकार दिलेल्या आदिवासी संशोधन या प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसखोरी करुन कार्यालयातील साहित्याचे मोडतोड केलेली आहे, अशा कायदा हातात घेणाऱ्या व राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या विकृत समाजकंटकांचा आम्ही निषेध करीत असुन अशा समाजकंटक गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा अशायचे निवेदन तालुक्यातील आ. वैभवराव पिचड यांनी अकोलेचे तहसिलदार मुकेश कांबळे यांना दिले. यावेळी गिरजाची जाधव, मंगलदास भवारी , माधव गभाले आदी उपस्थित होते.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
आ. पिचड पुढे म्हणाले की, दि.२४ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसखोरी करुन काही गुंड प्रवृत्तीच्या विकृत समाजकंटकांनी या कार्यालयात पत्रके फेकुन कार्यालयात साहित्यांची मोडतोड केलेली आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी व संशोधनासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने अनेक संदर्भ पुस्तके, सर्व्हेक्षण व संशोधनासाठी कागदपत्रे , जुने व प्राचीन दस्ताऐवज , प्राचीन मौल्यवान छायाचित्रे उपलब्ध करुन दिलेली आहे. सदरच्या संस्थेचे शासनाने स्वायत्त संस्थेच्या दर्जा दिलेला आहे. सदरच्या संस्था ही गेल्या ५० वर्षापासुन आदिवासी संदर्भात काम करीत असुन ही देशातील नामवंत संस्था म्हणुन गौरवण्यात आलेली आहे. माजी राष्ट्रपती मा. प्रणवजी मुखर्जी यांचेहस्ते संस्थेचे गौरव करण्यात आलेला आहे. सदर संस्था नावारुपास येण्यासाठी व महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जमातीची सांस्कृतिक वैशिष्टे राहणीमान, शेती व कामाची पध्दत अशा अनेक गोष्टींचे सेशाधन कै. गोविंद गारे साहेब यांच्यासारख्या थोर संशोधकाने संशोधन करुन संस्थेच्या वैभवात फार मोलाची भर घातलेलीआहे. याची सर्व महाराष्ट्रतील आदिवासी जनतेला ज्ञात आहे . सदरची संस्था ही स्वायत्त असल्याने या कार्यालयावर हल्ला करणे अत्यंत दुर्देवी बाब आहे. त्यामुळे या संस्थेवर हल्ला म्हणजे आदिवासी जनतेच्या काळजावर हल्ला करण्यासाखे असुन या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत असून सदर घटनेची सपुर्ण चौकाशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे म्हणाले .
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.