Home अहमदनगर लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्त्यांसाठी आण्णांचा उपोषणाचा इशारा

लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्त्यांसाठी आण्णांचा उपोषणाचा इशारा

लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्त्यांसाठी आण्णांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर – स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव आणि लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या मागण्याचा पुर्ततेसाठी समाजसेतक अण्णा हजारेंनी आंदोलनाची इशारा दिला आहे. राळेगण सिध्दीमध्ये गांधी जयंतीच्या मुहुर्तावर, २ ऑक्टोबरपासुन बेमुदत उपोषणाव्दारे यास सुरुवात होईल.

अण्णांनी याच वर्षी मार्च महिन्यात उपरोक्त मागण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन केले होती. त्यावेळी पंतप्रधानाच्यावतीने कृषीराज्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत पुढील ६ महिन्यांत या मागण्यांवर निर्णय  घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र , ५ महिने उलटल्यानंतरही केंद्रसरकारने याबाबत कोणतही ठोस निर्णय न घेतल्याने अण्णांनी २ ऑक्टोंबरपासुन पुन्हा एकदा ओंदालनाची घोषणा केली आहे. यावेळी अण्णांनी आंदोलनासाठी आपले मुळगाव राळेगण सिध्दीची निवड केली असुन आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

केंद्र सरकारने आश्वासनांच्या पुर्ततेसाठी ६ महिन्यांची मुदत घेतली होती. पुढील एका महिन्यात केंद्र सरकार या मागण्यांबाबत निर्णय घेऊ शकते. दरम्यान , आज अण्णाच्यावतीने कार्यकर्त्यांसाठी एक पत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यात हमीभाव आणि लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्तयांसाठी आंदोलनाचा निर्धार व्यक्त करतानाच कार्यकत्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा पोस्टकार्ड पाठवण्याच्या सुचना केल्या आहेत. या पत्राचा ड्रॉफ्ट येत्या २ दिवसांमध्ये प्रसिध्द केला जाणार आहे. त्यानंतर त्या आशयाचा मजकुर पत्रे मोठया संख्येने पाठवण्याचे आवाहन केले जाईल.

अण्‍णांचे वाढते वय, आजारपण यामुळे अण्णांनी बेमुदत उपोषण करु नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण  आहे. अण्णांनी आंदोलन करावे, मात्र उपोषण टाळावे असाही मतप्रवाह आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राळेगण सिध्दीत न येता आपापल्या शहरातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here