Home Accident News Accident: ट्रकने दुचाकी चालकास उडविले, अपघातात तरुण जागीच ठार

Accident: ट्रकने दुचाकी चालकास उडविले, अपघातात तरुण जागीच ठार

Kopargaon Acident News: ट्रक दुचाकीत अपघात, तरुण ठार, ट्रक चालक फरार.

truck hit the bike rider, the youth was killed on the spot in the accident

कोपरगाव: कोपरगाव शहराजवळ साई धाम कमानीजवळ नगर मनमाड रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तरुण जागीच ठार झाला आहे. सोमवारी दुपारी हा अपघात झाला आहे. सचिन काशिनाथ रोहोम वय ३० रा. खिर्डी गणेश ता. कोपरगाव हा तरुण ठार झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने दुचाकीस्वारास उडवले आहे. त्यात सचिन रोहोम हा जागीच ठार झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रस्त्यावर गाळ साचून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मयत सचिन हे मुलगी माहेश्वरी हिला भेटण्यासाठी शिर्डी येथील रूग्णालयात जात असताना भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने (क्रं.यू.पी.78 डी, एन.9091) याने त्यांच्या दुचाकीला (हिरो होंडा सी.डी.डिलक्स क्रं.एम.एच.17 ए.एल.2975) स्वारास मागील बाजूने धडक दिली. त्यात तो जागीच ठार (Death) झाले.

कंटेनर चालक कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन अपघात ग्रस्त इसमास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील वैद्यकीय उपचार करणार्‍या अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केल.

महेश हरिभाऊ रोहोम (वय-25) रा.खिर्डी गणेश यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.219/2022 भा.द.वि कलम 304,(अ) 279,337,338,427 मोटार वाहन कायदा कलम 184,134,(अ)(ब) 177 प्रमाणे दाखल केला आहे.

Web Title: truck hit the bike rider, the youth was killed on the spot in the accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here