Home पुणे Rape: स्कूल बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape: स्कूल बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Pune Rape Case: स्कूल बस चालकाने केला बलात्कार.

School bus driver rape a minor girl

पुणे: उशिरा शाळेतून घरी आल्यावर वडिलांनी विचारल्यावर १० वीत शिकत असलेल्या मुलीने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. हा प्रकार वडिलांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केल्यावर तिच्यावर चौघांनी अत्याचार केला नाही तर तिचे स्कूल बसचालकाबरोबर रिलेशनशिप असून तिच्यावर गेल्या काही महिन्यापासून अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोमेश्वर घुले पाटील वय ३५ उंड्री याला अटक केली आहे.  

याबाबत उंड्री येथे राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कूल बसमधून शाळेत ये जा करीत असे. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादी हिला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहिती नसताना तिने होकार दिला. तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.

१६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तिच्या वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी मुलीला खोदून खोदून चौकशी केली. तिने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. या प्रकाराने तिचे वडिल हादरुन गेले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. सामूहिक अत्याचाराच्या घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने या मुलीकडे चौकशी सुरु केली, तेव्हा पोलिसांशी बोलताना ही मुलगी गडबडून गेली. तिने खरा प्रकार सांगितला. वैद्यकीय तपासणीत तिचे शारीरिक संबंध आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमेश्वर घुले याला अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: School bus driver rape a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here