Home Maharashtra News खळबळजनक: भरदिवसा दोन सख्ख्या भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

खळबळजनक: भरदिवसा दोन सख्ख्या भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

Ambarnath Crime News: कारमधून येऊन दोन तीन जणांनी केला गोळीबार (Firing).

Two brothers shot dead firing daylight, one dead today

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये शुक्रवारी दुपारी खळबळजनक घटना घडली आहे. सख्ख्या भावंडावर भरदिवसा गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, व्यावसायिक वादातून हा गोळीबार झाला आहे.

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर आज दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. तुषार गुंजाळ आणि गणेश गुंजाळ या दोन सख्ख्या भावांवर हा हल्ला करण्यात आला. यापैकी तुषार याला गोळी लागल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला, तर गणेश याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यात तो जखमी झाला.

एका कारमधून दोन ते तीन जण आले होते. त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर हा प्रकार जुन्या व्यावसायिक वादातून घडल्याचा संशय पोलिसांना आहे. या हल्लेखोरांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Two brothers shot dead firing daylight, one dead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here