अहमदनगर ब्रेकिंग: आश्रम शाळेतील दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
Ahmednagar | Pathardi News: आश्रम शाळेतील दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
पाथर्डी: तालुक्यातील आल्हनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळेतील पायल संदीप पांढरे (वर 9) इयत्ता तिसरी व सुरज संदीप पांढरे (वर 8) इयत्ता दुसरी हे निवासी शाळेतील मुले शाळेच्या पाठीमागच्या बाजुला असलेल्या शेततळ्यात बुडुन शुक्रवारी (दि.27) रोजी दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना घडल्यानंतर आश्रमशाळेचे संस्थाचालक घटनास्थळी आले नाहीत.
आश्रमशाळेत असणारे मुले मधल्या सुट्टीत शेजारच्या शेततळ्यात पोहायला गेले होते.त्यांनी कपडे शेततळ्याच्या भिंतीवर काढुन ठेवले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर मुलांना वरती येता आले नाही. पाण्यात बुडुन मुलांचा मृत्यु झाला. दोघेजण शाळेतुन बाहेर गेले. मग अधिक्षक कुठे होते. त्यांची चौकशी करा. एवढी गंभीर घटना घडली संस्थाचालक गायब का झाले. त्यांची घटनास्थळी येण्यास का टाळाटाळ केली. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले होते. गरीब कुटुंबातील मुलांचा मृत्यु झाल्याने ग्रामस्थांचा राग वाढतच गेला. याला जबाबदार नेमके कोण ? हे ठरवा असा आग्रह धरीत ग्रामस्थांनी सुमारे साडेचार तास मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. रात्री उशीरापर्यंत पोलिस अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरु होती.
दरम्यान, मुलांच्या मृत्युस कोण जबाबदार हे निश्चीत करा. तो पर्यंत मुलांचे मृतदेह उचलु देणार नाहीत अशी भुमिका संतप्त झालेल्या आल्हणवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, नाईक सुहास गायकवाड व सहकारी घटनास्थळी गेले. ग्रामस्थांशी चर्चा केली. रात्री उशीरापर्यंत ग्रामस्थ पंचनामा करा व मृत्युला नेमके कोण जबाबदार हे निश्चीत करा व मगच मृतदेह उचला असा गोंधळ सुरु होता. मुलांचे नातेवाईक बाहेरगावी असल्याने त्यांना घटनास्थळी यायला उशीर झाला.
Web Title: Two children of an ashram school drowned on the farm
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App