Home अहमदनगर अहमदनगर: माजी केंद्रीय मंत्री, संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड

अहमदनगर: माजी केंद्रीय मंत्री, संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड

Former union minister Babanrao Dhakne died at the age of 87 in Ahmednagar.

Former union minister Babanrao Dhakne died at the age of 87 in Ahmednagar

अहमदनगर: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे प्रदीर्घ आजाराने रात्री नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील ‘खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले. बबनराव ढाकणे हे माजी केंद्रीय मंत्री होते.

दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी दिली.

जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. पुढे राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ओढले गेले.

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही भाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. बबनराव ढाकणे हे विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. गेल्यावर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बबनराव ढाकणे यांनी केलेले भावनिक भाषणही चांगलेच गाजले होते.

बबनराव ढाकणे यांनी बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा एकापाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या ते चढत गेले. एक संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात पाथर्डी तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत पत्रके भिरकावली होती. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्रीपद भुषविले होते. तसेच पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये बबनराव ढाकणे हे उर्जा राज्यमंत्री होते.

Web Title: Former union minister Babanrao Dhakne died at the age of 87 in Ahmednagar

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here