अहमदनगर ब्रेकिंग: एकाच शिवारात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ
Ahmednagar, Kopargaon: दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ.
कोपरगाव: शहरातील शिंगणापूर व संवत्सर शिवारात दोन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे रेल्वे स्टेशन जवळील सरकारी दवाखान्याच्या परिसरात एक अनोळखी इसम वय 30 वर्ष मयत अवस्थेत आढळून आला. सदर इसमाची ओळख पटलेली नसून त्याच्या जवळ गोळ्या औषधे मिळून आल्याने सदर इसमाचा आजारी असल्याने थंडीने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
तर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शिंगणापूर ते संवत्सर दरम्यान काळा माथा शिवारात रस्त्याच्या कडेला दुसरा एक अनोळखी इसम अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचीही अद्याप ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
या दोन्ही घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पुंड, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर तमनर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुर्हाडे यांनी घटनास्थळी जावून दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करत सदरचे दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. पुंड हे करीत आहेत.
Web Title: two dead bodies were found in the same Shiwar
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App