Home संगमनेर संगमनेर शहरात दोन दिवसांत आढळले दोन मृतदेह

संगमनेर शहरात दोन दिवसांत आढळले दोन मृतदेह

Sangamner News: शहारातील दोन वेगवेगळ्या भागात दोन दिवसात दोन इसमांचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याची घटना.

wo dead body were found in Sangamner city in two days

संगमनेर:  संगमनेर शहारातील दोन वेगवेगळ्या भागात दोन दिवसात दोन इसमांचा मृतदेह आढळून आला. यात एक महिला व एका पुरूषाचा समावेश आहे.

याबाबत माहिती की, रविवारी सकाळी शहरातील नेहरू चौक येथील अशोक स्तंभा शेजारी एक अज्ञात इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. बराच वेळ झाला तरी त्याची कोणतीही हलचाल होत नसल्याने या तरूणांनी त्याला उठून पाहिले परंतू तो उठला नाही. त्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष तुषार ठाकूर यांनी याबाबतची माहिती नगरपालीकेच्या रूग्णवाहिकेला दिली. त्यानंतर रूग्णवाहिकेतून सदर मृतदेह कॉटेज रूग्णालयात नेण्यात आला. सदर इसम हा भिकारी असून रात्रीच त्या ठिकाणी मरून पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तर दुसरी घटना काल सोमवारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील सप्तश्रृंगी माता मंदिरा समोरील उघड्या गटारीसमोर घडली. या रस्त्यावर नगर पालीकेची मोठी उघडी गटार असून ही गटार खोल व नेहमी वाहते असती. सोमवारी सकाळी कचरा गोळा करणारी अज्ञात महिला या गटारीत पडून गंभीर जखमी झाली व तेथेच मृत पावली. दुपारी ही घटना समजल्यानंतर परिसरातील नागरीकांनी प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर सदर महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कॉटेज रूग्णालयात पाठविण्यात आले. या दोन्ही घटने संदर्भात पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान अकोले रोडवरील उघड्या गटारीमुळे अनेक वेळा अपघात घडतात तसेच यात मोठ्या प्रमाणावर कचरा, माती टाकली जात असल्याने सदर गटार बंदिस्त करावी अशी मागणी नागरीकांनी केले आहे.

Web Title: Two dead body were found in Sangamner city in two days

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here