Home महाराष्ट्र भरवस्तीत सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, महिलेसह तरुण ताब्यात

भरवस्तीत सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, महिलेसह तरुण ताब्यात

पोलिसांनी छापेमारी करून भरवस्तीत सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा (Sex Racket) पर्दाफाश केल्याची घटना समोर आली आहे.

'Sex racket' going on in the trust is exposed, the youth along with the woman arrested

यवतमाळ : वणी शहरातील सेवानगर परिसरात पोलिसांनी छापेमारी करून भरवस्तीत सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश केल्याची घटना समोर आली आहे. ‘सेक्स रॅकेट’ चालविणार्‍या महिलेसह एकाला ताब्यात घेतले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वणी शहरातील सेवानगर येथील एका घरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गुप्तमाहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी कारवाईच्या सूचना केल्या. सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांनी पथकासह घटनास्थळ गाठत छापेमारी केली. त्यावेळी नागपूर येथील ३६ वर्षीय महिलेसह एका २९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी घराची झडती घेत ४१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सेक्स रॅकेट चालवणारी महिला व वणी येथील तरुणाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे, दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक हिरे, सागर सिडाम, सुहास, वानोळे, विजय वानखेडे, इकबाल, सतोष कालवेलकर, विशाल यांनी केली.

Web Title: ‘Sex racket’ going on in the trust is exposed, the youth along with the woman arrested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here