Home अकोले अकोलेत दोन गटांत तुफान हाणामारी, १५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

अकोलेत दोन गटांत तुफान हाणामारी, १५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

Akole Crime: वाळूतस्करांच्या दोन गटांत मंगळवारी तुफान राडा.

Two groups clashed in Akole, 15 people were Crime booked for rioting

अकोले : अवैध वाळू व्यावसायिकांच्या अंतर्गत वादातून झालेल्या तुफान हाणामारीत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण 15 जणांवर गुन्हे दाखले झाल्याने तालुक्यातील वाळू व्यावसायिकांचा अंतर्गत वाद आहे. चव्हाट्यावर आला आहे.

वाळूतस्करांच्या दोन गटांत मंगळवारी तुफान राडा झाला. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील ढोकरी फाटा येथे घडली. सुहास पुंडे यांचे फिर्यादीवरून ऋषिकेश उत्तम देशमुख (रा. सुगाव बु., ता. अकोले), सचिन किसन सदगीर (रा. पिंपळगाव नाकविंदा), अनिल बाळासाहेब पवार (रा. सुगाव खु), सागर देशमुख (रा. इंदोरी), राहुल जाधव (रा. चितळवेढे), जगन वसंत देशमुख (रा. इंदोरी), जावेद जहागिरदार (रा. अकोले), अजित येवले (रा. मेहेंदुरी फाटा) व रवी आहेर (रा. पिंपळगाव कोंझीरे, ता. संगमनेर) हे नऊजण आणि आणखी सहाजण अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग

सागर विजय देशमुख याच्या फिर्यादीवरून सुहास भाऊसाहेब पुंडे, सागर भाऊसाहेब पुंडे, भाऊसाहेब पुंडे (रा. ढोकरी ता. अकोले), कमलेश डेरे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. डेरेवाडी ता. संगमनेर), शुभम चव्हाण (रा. गुरवझाप, ता. अकोले), अतुल बाळासाहेब देशमुख (रा. सुगाव, ता. अकोले), अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (रा. कळस, ता. अकोले) या सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भांडणात बंदुकीचा वापर नाही

या गुन्ह्यात सुहास पुंडे या फिर्यादीने मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले होते. मात्र अकोले पोलिस ठाण्याचे स.पो.नि. मिथुन घुगे यांनी या घटनेचा इन्कार करीत कुठेही बंदूक वापरली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अकोले पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल झाले आहे. दोन्ही गटातील १५ जणांवर विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. मिथुन घुगे करित आहे.

Web Title: Two groups clashed in Akole, 15 people were Crime booked for rioting

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here