घारगाव शिवारात टँकर-ट्रक अपघातात दोन ठार, दोन जखमी
Ahmednagar News: भरधाव टैंकर आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यात दोनजण ठार तर दोनजण गंभीर जखमी.
श्रीगोंदा: भरधाव टैंकर आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यात दोनजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात अहमदनगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील खोमणे वस्ती परिसरात हा अपघात सोमवारी (दि. ३१) मध्यरात्री झाला.
टँकरचालक बालाजी महादेव बन (वय ३०, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) जागीच ठार झाले तर अंकुश पोपट साळवे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांचा नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर रामदास दिघे (वय २९, रा. चिंभळे, श्रीगोंदा), महेश तुकाराम चांदगुडे हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुंभ (दौंड) येथील नीलेश विलास जगताप यांचा टैंकर (क्र. एमएच ४२ एआर ६९८५) रविवारी रात्री कुरकुंभ येथून नगरकडे चालला होता. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घारगाव शिवारातील खोमणे वस्ती परिसरात टँकर आला असता नगरकड्डून दौंडकडे कांद्याच्या गोण्या घेऊन एक ट्रक (क्र. एमएच १२ एमव्ही ७४९७) चालला होता. त्यावेळी टैंकर व ट्रक दोन्हीमध्ये जोराची धडक झाली.
Web Title: Two killed, two injured in tanker-truck accident in Ghargaon Shivara
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App