Home Accident News अहमदनगर: स्कूल बसच्या धडकेत शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू

अहमदनगर: स्कूल बसच्या धडकेत शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू

Ahmednagar News:  सायकल वरून शाळेला निघालेल्या बहीण भावाला स्कूल बसने धडक (Accident) दिल्याने  13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना.

Accident School girl dies in collision with school bus

कोपरगाव | Kopargaon:  सायकल वरून शाळेला निघालेल्या बहीण भावाला स्कूल बसने धडक दिल्याने  13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना  तालुक्यातील पढेगाव शिवारातील न्यू इंग्लिश स्कूल समोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी  बस चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोमलच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मुलीचे वडील नारायण पगारे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील रहिवासी आहेत. मुलगी कोमल (वय 13) व मुलगा ऋतिक (वय 11) हे दोघे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये जात होते. त्यावेळी समोरून येणार्‍या गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसने (क्र. एमएच 17 बीडी 1801) माझ्या दोन्ही मुलांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर बस चालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी घटनास्थळावरून पळून गेला. त्यामुळे या अपघातात मुलगी कोमलचा जागीच मृत्यू  झाला तर मुलगा ऋतिक यास गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी नारायण नाना पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्कूल बस चालकाविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बसचालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करीत आहेत.

Web Title: Accident School girl dies in collision with school bus

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here