Home औरंगाबाद धक्कादायक! भरदिवसा घरात घुसून गोळीबार

धक्कादायक! भरदिवसा घरात घुसून गोळीबार

Chhatrapati Sambhajinagar:  भरदिवसा एका व्यक्तीच्या घरात दोन अज्ञातांनी घुसून गोळीबार (Firing) केल्याची घटना.

broad daylight, housebreaking, and firing

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका व्यक्तीच्या घरात दोन अज्ञातांनी घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील पुंडलिक नगर परिसरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ज्या व्यक्तीच्या घरात गोळीबार झाला ती व्यक्ती मनपा स्वच्छता कर्मचारी आहे. या अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पीडित व्यक्तीने समय सूचकता दाखवत मान बाजूला केली, म्हणून त्यांचे थोडक्यात प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबार केल्यानंतर या दोन्ही अज्ञात व्यक्तींनी पळ काढला आहे. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात आरोपी दिसत आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.

Web Title: broad daylight, housebreaking, and firing

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here