kidnap: दोन अल्पवयीन मुलीना फूस लावून पळविले
राहुरी | Rahuri: तालुक्यातील कारखाना परिसरातून एक १३ वर्षीय व १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचे (kidnap) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत राहुरी कारखाना येथील परिसरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबांसमवेत राहते. २२ मार्चला मोबाईलला बॅटरी टाकून येते असे सांगून घरातून बाहेर गेली ते पुन्हा घरी आली नाही. याबाबत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना राहुरी कारखाना येथे २३ मार्च रोजी रात्री घडली. रात्री ९ ते पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. वडिलानी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Two minor girls were kidnap lured away