Home Maharashtra News संतापजनक: ४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार

संतापजनक: ४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार

4 year old girl abducted and sexually abusing 

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून फिरस्त कुटुंबातील 4 वर्षीय मुलीचे पहाटेच्या सुमारास अपहरण (abducted)करून तिच्यावर अत्याचार  (sexually abusing) करणाऱ्या नराधमाला अखेर सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. संकेत गुजर वय 26 राहणार तामजाई नगर असे संशयित आरोपीचे नाव आहे. याआगोदर त्याच्यावर सातारा तालुका हद्दीत जबरी चोरीचे वेगवेगळे 17 गुन्हे दाखल आहेत.

4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर सातारा शहरासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही  कॅमेरे तपासले असता मात्र तरीही आरोपी न सापडल्याने आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसानी सोशल मीडिया वर व्हायरल केले होते.

हे व्हायरल फुटेज आरोपीच्या वडिलांनी आणि भावाने हे ओळखून शहर पोलिसांशी संपर्क साधला असता संबंधित युवक हा माझा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले. या दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने आधीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांत स्वतःहून हजर झाला होता त्याला न्यायालयीन कोठडी ही मिळाली होती. त्यावरून सातारा तालुका पोलिसानी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीस अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: 4 year old girl abducted and sexually abusing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here