Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात अपघात दोन जण ठार

संगमनेर तालुक्यात अपघात दोन जण ठार

Breaking News | Sangamner Accident: अपघातामध्ये दोन जण ठार झाल्याची घटना घडलीTwo persons killed in accident in Sangamner taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यात एका अपघातामध्ये दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.  संगमनेर तालुक्यात निमोण येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने दोन जण ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, लोणी ते नांदूर शिंगोटे रोडवर निमोण परिसरात कंटेनर नंबर (Gj 15AV 66 56) व पल्सर मोटर सायकल यांची समोरासमोर धडक झाली.  या अपघातामध्ये कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ वय 30 राहणार नांदूर शिंगोटे युवराज धोंडीबा मेंगाळ वय 29 हे जागीच ठार झाले. या अपघातामध्य संदीप संतोष आगिवले राहणार गर्दनी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळतात तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी अपघात ग्रस्त कंटेनर ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Two persons killed in accident in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here