Home अहमदनगर अहमदनगर: मोटारसायकलला कंटेनरची धडक; वडील जागीच ठार, मुलगा जखमी

अहमदनगर: मोटारसायकलला कंटेनरची धडक; वडील जागीच ठार, मुलगा जखमी

Breaking News | Ahmednagar Accident: वडील व मुलगा मोटारसायकलवरून कोल्हारकडून नगरकडे जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोराची धडक.

Motorcycle collided with container The father was killed on the spot

राहुरी : शहर हद्दीत नगर-मनमाड रस्त्यावर वडील व मुलगा मोटारसायकलवरून कोल्हारकडून नगरकडे जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. या घटनेत विजय शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी (२० एप्रिल) सकाळी घडली.

विजय द्वारकानाथ शिरसाठ (वय ३० वर्षे) व ओम विजय शिरसाठ (वय १२ वर्षे) रा. कोल्हार खुर्द हे दोघे शनिवारी सकाळी १०:३० वा. मोटरसायकलवर एका लग्न समारंभासाठी जात होते. नगर- मनमाड रस्त्याने जात असताना जोगेश्वरी आखाडा परिसरात त्यांच्या मोटारसायकलला एका कंटेनरची जोरात धडक दिली. यावेळी विजय शिरसाठ यांना गंभीर मार लागला होता. त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात नेत असताना मध्येच मृत्यू झाला.

Web Title: Motorcycle collided with container The father was killed on the spot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here