Home अकोले अकोलेत एकाच दिवसात दोन आत्महत्याच्या घटना

अकोलेत एकाच दिवसात दोन आत्महत्याच्या घटना

Akole News:   अकोले शहरातील 35 वर्षीय सुवर्णकारासह धुमाळवाडी येथील 19 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना.

Two suicide incidents in the same day in Akole

अकोले: अकोले शहरातील 35 वर्षीय सुवर्णकारासह धुमाळवाडी येथील 19 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. .याप्रकरणी अकोले पोलिसांनी दोघांच्याही मृत्युची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

अकोले शहारालगत असणाऱ्या धुमाळवाडी येथील युवराज नवनाथ धुमाळ (वय-19)याने आज 21 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.संगमनेर येथे आठवडाभरापूर्वी गंगामाई घाटावर अकोलेतील दोन महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यावेळी त्या युवकांसोबत असलेला त्यांचा मित्र युवराज धुमाळ हाही पाण्यात बुडत असतांना त्याला वाचविण्यात यश आले होते मात्र मित्रांच्या अपघाती मृत्यू मधून सावरत असतानाच आज युवराजने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.याबाबत बाबासाहेब लक्ष्मण धुमाळ यांनी दिलेल्या खबरी वरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तर दुसऱ्या घटनेत अकोले शहरातील तरुण सुवर्णकार पंकज भगीरथ म्हसे (वय-35,रा. अकोले)याने आज सायं.6-30 वाजेच्या दरम्यान आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.आहे.

अकोले शहर व परिसरात झालेल्या या युवकांच्या आत्महत्या बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.या दोन्हीही घटनेतील युवकांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Two suicide incidents in the same day in Akole

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here