Home अहमदनगर अहमदनगरमध्ये विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, एका रात्रीत असं काय घडल?

अहमदनगरमध्ये विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ, एका रात्रीत असं काय घडल?

Ahmednagar Crime News:  एकाच विहरीत चार मृतदेह (four dead bodies ) आढळले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ.

four dead bodies were found in a well in Ahmednagar

अहमदनगर | पाथर्डी:  जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील बाभूळगावमध्ये एकाच विहरीत चार मृतदेह आढळले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. रात्रीच्या वेळेस यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे एका रात्रीत असं काय घडल?  सामूहिक हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.

कांचन सांगडे, निखिल सांगडे, निशिधा सांगाडे आणि संचिता सांगडे अशी मृतांची नावे आहेत. सर्व जण एकाच कुंटुबातील आहेत. रात्रीच्या वेळेस यांचा मृत्यू झाला असून सकाळी यांचे मृतदेह विहीरीत आढळून आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

कांचन सांगडे आणि तिची 3 मुले निखिल, निशिधा आणि संचिता यांचे हे मृतदेह आहेत. सांगडे परिवार नांदेड जिल्ह्यातील आहे. कांचन सांगडे हीचा पती धम्मपाल हा एका पॉल्ट्रीफार्ममध्ये काम करतो.  कांचन आणि तिचा पती धम्मपाल यांच्यात वाद झाला होता. यानंतर कांचनसह तिच्या 3 मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे समजू शकलेले नाही. कांचन सांगडे हीचा पती धम्मपाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सामूहिक हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: four dead bodies were found in a well in Ahmednagar

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here