Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर दुचाकींचा अपघात, दोन तरुण ठार

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर दुचाकींचा अपघात, दोन तरुण ठार

Sangamner News: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी येथे दुचाकीचा भीषण अपघात (Accident) होवून दोन तरुण ठार झाल्याची घटना.

Two-wheeler accident on Nashik-Pune highway, two youths killed

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी येथे दुचाकीचा भीषण अपघात  होवून दोन तरुण ठार झाले. हा अपघात सोमवारी (दि.10) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.

समीर बाळू तळपे (वय 28) व सुरेश दत्तात्रय जोशी (वय 22) असे अपघातात मृत  झालेल्या तरुणांचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तळपेवाडी येथील समीर तळपे व सुरेश जोशी हे दोघे दुचाकीवरुन (क्र.एम.एच.05, ए.के.4265) आळेफाटा येथून बोट्याकडे येत होते. ते सोमवारी सायंकाळी बोटा शिवारातील माळवाडी येथे आले असता त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. यात सुरेश जोशी याचा जागेवरच मृत्यू (Death) झाला. गंभीर जखमी झालेल्या समीर तळपे याला पुढील उपचारांसाठी पुणे येथे नेत असताना त्याचाही मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच घारगाव व डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी (दि.11) तळपेवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहे.

Web Title: Two-wheeler accident on Nashik-Pune highway, two youths killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here