Home क्राईम पतीचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध; पत्नीने घेतलेला निर्णय तिच्याच अंगलट

पतीचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध; पत्नीने घेतलेला निर्णय तिच्याच अंगलट

Nagpur Crime: महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार (Rape), महिलेने लग्नाची मागणी करताच इन्स्टाग्रामवर बदनामी करणाऱ्या प्रियकराला मानकापूर पोलिसांनी अटक.

Rape of a woman by luring her into marriage

नागपूर: महिलेने लग्नाची मागणी करताच इन्स्टाग्रामवर बदनामी करणाऱ्या प्रियकराला मानकापूर पोलिसांनी अटक केली. आरोपीने सुरुवातीला महिलेसोबत फेसबुकवरून मैत्री केली होती. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि ते आणखी जवळ आले होते. त्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. विरोध केल्यानंतर आरोपीने महिलेची बदनामी करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पतीचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे पीडित महिलेने प्रेमसंबंध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या महिलेची ओळख फारुकसोबत झाली. फारुकने मदत करण्याच्या बहाण्याने लग्नाचे आमिष दाखवले आणि महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले. यावेळी फारुकने महिलेचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढले होते. यानंतर फारुकने हे फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यानंतर महिलेने विवाहाबद्दल फारुककडे वारंवार विचारणा केली होती. मात्र त्याने नेहमीच टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर महिलेने कडक शब्दात फारुकडे विचारणा केली आणि पोलिसांत देण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी फारुकने महिलेचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या सर्व प्रकारानंतर पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी फारूकला अटक केली आहे.

मोहम्मद इरशाद फारूक अंसारी  (23 ) असं आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. फारुकची 30 वर्षीय महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर फारुकने प्रेम आणि लग्नाचं आमिष देत तिच्यावर अत्याचार केला. पण जेव्हा महिलेने लग्नासाठी विचारणा केली तेव्हा फारुकने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. महिलेने पोलिसांत जाण्याची धमकी देताच आरोपीने महिलेचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी फारुकला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Rape of a woman by luring her into marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here