Home Accident News अकोले: दुचाकी आणि मालवाहू टेम्पोची धडक , युवक ठार, एक जखमी

अकोले: दुचाकी आणि मालवाहू टेम्पोची धडक , युवक ठार, एक जखमी

Breaking News | Akole Accident: गांजवणे घाटात दुचाकी आणि मालवाहू टेम्पोची धडक होऊन माणिक ओझर युवकाचा जागीच मृत्यू.

Accident Two-wheeler and cargo tempo collide, youth killed

राजूर : राजूरपासून जवळच असलेल्या गांजवणे घाटात दुचाकी आणि मालवाहू टेम्पोची धडक होऊन माणिक ओझर येथील सत्यम मधुकर जंगले (वय २१) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर समीर होनाजी बोटे (वय २२) गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

जंगले व बोटे हे दोघे दुचाकीवरून माणिक येथून राजूरच्या दिशेने येत होते. गांजवणे परिसरात ते एसटी बसला ओव्हरटेक करून पुढे निघाले असता समोरून येणारा मालवाहू टेम्पो व दुचाकीची धडक झाली.

या अपघातात सत्यम जंगले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर समीर बोटे हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले आहे. मयत सत्यमचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास राजूर पोलीस करीत आहे.

Web Title: Accident Two-wheeler and cargo tempo collide, youth killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here