Home Accident News संगमनेर ब्रेकिंग: ऐन भाऊबीजेच्या दिवशी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

संगमनेर ब्रेकिंग: ऐन भाऊबीजेच्या दिवशी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

Sangamner Accident: छोटा हत्ती व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू.

Two youths died in an accident on Ain Bhaubije Day

संगमनेर : ऐन भाऊबीजेच्या दिवशी साकुर येथील दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. . पिंपळगाव देपा जवळ छोटा हत्ती व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील ओम राहुल पेंडभाजे व शुभम सदाशिव टेकूडे या दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने साकुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

ओम आणि शुभम हे दोघे मोटारसायकलवरून संगमनेरला जात होते. तर छोटाहत्ती साकुरकडे येत असताना पिंपळगाव देपा शिवारात वाहनांचा अपघात झाला. परंतु ऐन भाऊबीजेच्या दिवशी ही घटना घडल्याने साकुरकरांवर शोककळा पसरली आहे. दोघांच्या निधनाने पठार भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Two youths died in an accident on Ain Bhaubije Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here