Home अहमदनगर मित्राच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने दुसर्‍या मित्राचा काही तासांतच  मृत्यू

मित्राच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने दुसर्‍या मित्राचा काही तासांतच  मृत्यू

Ahmednagar News: मित्राच्या विरहाने मित्रांने प्राण सोडल्याची घटना.

Unable to bear the loss of a friend, the death of another friend within hours

राहता:  मित्राच्या विरहाने मित्रांने प्राण सोडल्याची घटना समोर आली आहे. राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील संपतराव कारभारी वाकचौरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ही वार्ता त्यांचे मित्र भास्कर गीर गोसावी यांच्या कानावर पडली. माझा जिवलग मित्र हरपला असे ते वारंवार बडबड करू लागले. मित्राच्या निधनाचे दुःख गोसावी यांना सहन झाले नाही. आठ तासानंतर मित्राच्या विराहापायी गोसावी यांनी प्राण सोडून दिला. या घटनेने गोसावी व वाकचौरे कुटुंबासह नांदुर्खी ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. असून मित्राच्या विरहाने मित्रांने प्राण सोडला.

राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील शेतकरी भास्कर रतनगीर गोसावी (वय 82) व प्रगतशील शेतकरी संपतराव कारभारी वाकचौरे या दोन मित्रांचे नुकतेच निधन झाले. भास्कर गोसावी व संपतराव वाकचौरे हे शेतकरी असल्याने दोघांची शेती एकामेकाच्याच शेजारी होती. अनेक सुख दुःखाच्या घटनेत हे दोन मित्र एकत्र येत असत. पंढरपूर वारी, पैठणची वारी, नाशिकची वारी आदी पायी दिंडी सोहळ्यामध्ये हे दोघे जण एकमेकांच्या आधाराने प्रवास करून सुखरूप घरी येत असत. अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Unable to bear the loss of a friend, the death of another friend within hours

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here