Home क्राईम अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तिचे अपहरण केले. त्यानंतर शेतातील त्याच्या घरात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार (Rape).

minor girl was kidnapped and rape

धुळे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तिचे अपहरण केले. त्यानंतर शेतातील त्याच्या घरात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. ही घटना साक्री तालुक्यातील एका खेड्यात घडली आहे.

याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तरुणाविरुध्द बलात्कारासह बाल-लैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील एका खेड्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस राहुल रवींद्र ठाकरे (२२) या तरुणाने दि. ६ जून ते दि. २९ जुलै २०२३ या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिला त्याच्या शेतातील घरात नेवून तेथे तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल ठाकरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: minor girl was kidnapped and rape

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here