Home महाराष्ट्र Weather Update: राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

Weather Update: राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

Weather Update: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे.

weather update Possibility of increased rainfall in the state

पुणे : दक्षिण पूर्व बंगालच्याउपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने ३ डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, डिसेंबरची सुरुवात पावसाने होत असून, शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत आहेत. त्यामुळे डिसेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे; कारण बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा पावसाचा राहणार आहे. पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला.

Web Title: weather update Possibility of increased rainfall in the state

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here