Bribe Crime: लाखाची लाच घेणारा ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात
Bribe Crime : विकासकामांच्या बिलापोटी 1 लाख 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडल्याची कारवाई.
नाशिक: वाढोली ( ता त्रंबकेश्वर) येथील विविध विकासकामांच्या बिलापोटी 1 लाख 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी त्रंबकरोडवरील पंचायत समिती आवारात केली.
अनिलकुमार मनोहर सुपे, (46) असे वाढोलीच्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी वाढोली (ता त्र्यंबक) ग्रामपंचायत अंतर्गतचे निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्यदित (मु.पो.आंबोली ता.त्र्यंबक, जिल्हा- नाशिक)चे नावे वाढोली गावचे विविध कामे घेतलेली होती.
सदर कामे तक्रारदारने विहित कालावधीमध्ये पुर्ण केलेली असून काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली. मात्र 2 लाख 99 हजार 776 रुपये या रकमेचे बिल हे वाढोली ग्रामपंचायतीकडून मिळाले नाही.
त्याबाबत तक्रारदारने ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिलबाबत विचारणा केली. सदर बिल मंजुर करण्यासाठी 30 हजार रुपये व यापुर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे.
त्याचे बक्षीस म्हणुन 70 हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे 4 हजार रुपये असे एकूण 1 लाख 4 हजार रुपयांची ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदारकडे बुधवारी (ता 29) मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने याबाबत पडताळणी केली. त्यात सत्यता आढळून आली. त्यानुसार लाचखोर सुपे याने गुरुवारी (ता 30) सायंकाळी त्रंबक रोडवरील पंचायत समिती येथे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदारास बोलाविले. लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला आणि लाचखोर सुपे यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलिमा केशव डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.
Web Title: Gram Sevak taking bribe of lakhs in ACB’s net
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App