Sangamner | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका चार चाकी गाडीने धडक दिली. यामध्ये बिबट्या (Bibatya) कारच्या बोनेटमध्ये अडकला. मात्र वाहन चालकाने कार मागे पुढे घेऊन बिबट्याची सुटका होताच त्याने परिसरातील जंगलातील धूम ठोकली. या अपघातात बिबट्या जखमी झाला. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अज्ञात कार पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना कार संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आली असता त्याच दरम्यान बिबट्या रस्ता ओलांडत असताना बिबट्याला कारची जोराची धडक बसली. बिबट्याच्या कारच्या बोनेटमध्ये अडकला. बिबट्याने बराच वेळ प्रयत्न केला. कार चालकाने कार मागे पुढे घेत बिबट्याची सुटका केली आणि बिबट्याने धूम ठोकली. कार चालकही फरार झाला. यामध्ये बिबट्या जखमी झाला आहे.
Web Title: While crossing the road, the Bibatya got stuck in the bonnet of the car