Home महाराष्ट्र महाविकास आघाडीला धक्का! कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आउट तर भाजपचे प्रसाद लाड विजयी

महाविकास आघाडीला धक्का! कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आउट तर भाजपचे प्रसाद लाड विजयी

Vidhan parishad Election result 2022

Vidhan parishad Election Result: विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत २ मते बाद ठरविण्यात आली. तर २८३ मते वैध ठरविण्यात आली. पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले. यानंतर मोठी चुरस पाहायला मिळाली.

या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले तर कॉंग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना हार पत्करावी लागली. या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्या पराभवामुळे कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला आहे. तर प्रसाद लाड, प्रविण दरेकर यांच्यासहीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. सचिन अहिर, तर आमशा पाडवी यांचा विजय झाला आहे. कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहे. 

Web Title: Vidhan parishad Election result 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here