Home कोल्हापूर तू माझ्या बायकोकडे सारखं का बघतोस म्हणत डोक्यात दांडके घालून खून

तू माझ्या बायकोकडे सारखं का बघतोस म्हणत डोक्यात दांडके घालून खून

Breaking News | Crime: माझ्या बायकोकडं सारखं का बघतोस? तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून डोक्यात लाकडाने वार केल्याने जखमी, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना. खुनाचा गुन्हा दाखल. (Murder Case).

Why are you looking at my wife like that Murder Case

कोल्हापूर : डोक्यात दांडके घालून फरार झालेल्या तरुणाला तब्बल 13 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात माझ्या बायकोकडं सारखं का बघतोस? तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून डोक्यात लाकडाने वार केल्याने उत्तम भरमू नाईक (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर सचिन भिमराव नाईक (वय 36) हा पसार  झाला होता. हल्ला करून फरार झालेल्या तरूणाला तब्बल 13 दिवसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं ताब्यात घेतले असून  सचिनविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लिंगनूर पोलिस चौकीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर  त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान,  मिळालेल्या उत्तमने पोलिसांनी अवैध दारु व्यवसायाची टीप दिल्यानेच कृत्य केल्याची चर्चा रंगली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिद्रेवाडीमध्ये उत्तम नाईक व सचिन नाईक हे दोघेही शेजारी आहेत. रविवारी (7 जानेवारी) एकमेकांच्या शेजारी असून जेवून झाल्यानंतर बसले होते. यावेळी सचिनने उत्तमला ‘तू माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस? अशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर झालेल्या वादात लाकडी दांडक्याने डोक्यावर जोरात प्रहार केला. गंभीर जखमी झाल्याने उत्तम यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच उत्तम यांचा मृत्यू झाला. मारहाण केल्यानंतर सचिन फरार झाला होता.

Web Title: Why are you looking at my wife like that Murder Case

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here