अहमदनगरमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई; प्रतिबंधात्मक आदेश लागू, नेमकं काय कारण?
Breaking News | Ahmednagar: जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू, सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आला आहे.
अहमदनगर: जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 20 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवण्यास बंदी आहे.
यासोबतच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
Web Title: Prohibited gathering of more than 5 persons in Ahmednagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study