Home क्राईम प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

Dhule Crime:  मुलांना मारत असल्याचे तिला मुलांकडून समजल्यानंतर तिघांची मदत घेऊन मुकेश याचा खून (Murder) केल्याचे तपासातून समोर.

wife Murder her husband with the help of her lover and his friend

धुळे: शिरपूर तालुक्यातील तरडी येथे झालेल्या मुकेश राजाराम बारेला (३०) या तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात थाळनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पत्नीसह चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मयत मुकेश बारेला याची पत्नी मंगला मुकेश बारेला (३०) हिने तिचा प्रियकर सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा (३०) याच्यासह त्याचे मित्र दिनेश उर्फ गोल्या वासुदेव कोळी (१९) जितू उर्फ टुंगऱ्या लकड्या पावरा (२०) यांची मदत घेऊन खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. मंगलाचा पहिला पती मुकेश बारेला असून तो तिच्या मुलांना सतत मारत असायचा. दोन वर्षापासून मंगला ही त्याच्यासोबत राहत नव्हती. मुलांना मारत असल्याचे तिला मुलांकडून समजल्यानंतर तिघांची मदत घेऊन मुकेश याचा खून केल्याचे तपासातून समोर आले. तिघांना गुजरात राज्यातील पोरबंदर आणि एकाला शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक ए. एस. आगरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, थाळनेरचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे यांच्यासह पथकाने कारवाई केली.

Web Title: wife Murder her husband with the help of her lover and his friend

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here