Home नाशिक नाशिकमध्ये एकाच दिवशी इंजिनिअर तरुण-तरुणीने स्वतःला संपवलं!

नाशिकमध्ये एकाच दिवशी इंजिनिअर तरुण-तरुणीने स्वतःला संपवलं!

Nashik Crime:  दोन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नाशिक शहरातील आडगाव परिसरातून समोर आल्याने  आत्महत्यांच्या दोन्ही घटनांनी खळबळ.

Two students and a female student committed suicide in Nashik

नाशिक: नाशिक जिल्ह्यात आत्महत्या सत्र सुरूच आहे. एकाच दिवशी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक शहरातील आडगाव परिसरातून समोर आल्याने  आत्महत्यांच्या दोन्ही घटनांनी खळबळ उडाली आहे.

शहरातील आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षाच्या विद्यार्थिनीने म्हाडाच्या स्वप्नपूर्ती सोसायटीतील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. कल्याणी राजाराम थापाळे तालुका असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. थापाळे ही आडगाव शिवारात असलेल्या स्वप्नपूर्ती हाडा इमारतीत राहत होती. ती आडगाव परिसरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

दुसऱ्या घटनेत नाशिकच्या आडगाव शिवारातील वृंदावननगर येथे घडली. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने चौदा मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला घडली. साहिल बापूराव पवार असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअरचे नाव आहे. मदर तेरेसा आश्रमाच्या मागील बाजूस, दावन नगर येथे राहणाऱ्या साहिल पवार याने गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉ. सुनील बेंद्रे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, साहिल पवारने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले नसले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two students and a female student committed suicide in Nashik

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here