Home Accident News अहमदनगर: ट्रकच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर: ट्रकच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Ahmednagar Accident: मालट्रकने आजीसोबत पायी जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू.

three-year-old child died in a collision with a truck Accident

अहमदनगर: भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रकने आजीसोबत पायी जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आराध्या योगेश जाधव (वय ३) मयत चिमुकलीचे नाव आहे. 

अशोक ज्ञानेश्वर गोपाळे (रा. बारगाव नांदूर, ता. नगर), असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिस नाईक गणेश पांडुरंग कारे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत चिमुकली आजीसोबत मिरी ते पांढरीपूल रस्त्यावरील पांगरमल शिवारात रस्ता पार करत होती. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मालकट्रकने (एमएच १६, एएस ९७९५) धडक देऊन झालेल्या अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला.

Web Title: three-year-old child died in a collision with a truck Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here