Home Suicide News Suicide: पत्नीची आत्महत्या: चिट्ठी आढळून आल्याने सत्य उघडकीस

Suicide: पत्नीची आत्महत्या: चिट्ठी आढळून आल्याने सत्य उघडकीस

Wife's suicide The truth was revealed after the letter 

अहमदनगर | Ahmednagar Suicide Case: पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश शंकर भालेराव (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.

5 डिसेंबर 2021 च्या रात्री सुरेश याची पत्नी मिना सुरेश भालेराव (वय 60 रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने छताच्या लोखंडी ऍन्गलला गळफास घेवुन आत्महत्या (Suicide) केली होती.

मिना यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करतेवेळी डॉक्टरांना दोन चिठ्ठ्या मिळून आल्या होत्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. सदर चिठ्ठीतील मजकुरावरून मिना यांना पती सुरेश याने त्रास दिला आणि याच त्रासातून मिना यांनी गळफास घेतला असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसांनी मिना यांच्या दोन्ही मुलांना फिर्याद देण्यासाठी बोलविले.

याप्रकरणी सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालादरम्यान डॉक्टरांना मिळालेल्या चिठ्ठीवरून सुरेश भालेराव विरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

मिना यांच्या दोन्ही मुलांनी याप्रकरणी फिर्याद देण्यास नकार दिल्यानंतर पोलीस हवालदार राजु जाधव यांनी फिर्याद दिली आहे. मिना भालेराव यांनी 5 डिसेंबर 2021 च्या रात्री राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस आली.

Web Title: Wife’s suicide The truth was revealed after the letter 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here