Home अहमदनगर Rahuri: राहुरी जेलमधुन ५ आरोपी फरार

Rahuri: राहुरी जेलमधुन ५ आरोपी फरार

5 accused abscond from Rahuri Jail

राहुरी | Rahuri : तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू आहेतच त्यातच आज शनिवारी राहुरी कारावासातील पाच कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तुरूंगातून फरार झाले असल्याची घटना समोर आली आहे.  त्यामुळे राहुरी पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.

यामधील  स्टेशन रोड परिसरात दोघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र उर्वरित तिघे  पसार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी राहुरीत दाखल झाले आहेत.

नगर जिल्ह्यात लोणी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असल्याने पोलिस यंत्रणा सध्या सुरक्षाव्यवस्थेत व्यस्त असल्याचे पाहून आरोपींनी ही संधी साधली आहे. यापूर्वीही अनेक कैदी राहुरी कारावासातून पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत  मात्र, त्यांचा शोध लागलेला नसतानाच आता पुन्हा ही घटना घडल्याने पोलीस चक्रावले आहेत. राहुरी तालुक्यात कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे राहुरी पोलिसांची नाचक्की झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: 5 accused abscond from Rahuri Jail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here