Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारे आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारे आरोपी अटकेत

Accused of Rape and murder a minor girl arrested

पारनेर | Rape and Murder Case:  पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणार्‍या आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिथापीने अटक केली आहे.

प्रवीण दत्तात्रय सालके व बाळू उर्फ अमोल देशमुख (रा. जवळा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार करून खून केल्याची घटना २० ऑक्टोबरला घडली होती. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता.

जवळा परिसरातील ३५ पेक्षा जास्त संशयितांची कसून चौकशी पारनेर पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केली होती. पिडितेच्या कुटुंबातील २५ सदस्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी देखील पोलिसांनी पावले टाकली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली असता एकतर्फी प्रेमातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केला झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.

प्रवीण सालके व बाळू उर्फ अमोल देशमुख या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. अनेक वेळा त्यांच्या चौकशीत विसंगत माहिती समोर आल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी याप्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. दोन ते तीन दिवसांत आम्ही आरोपीपर्यंत पोहचू असा आशावाद पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Accused of Rape and murder a minor girl arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here