Home अहमदनगर धक्कादायक: चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार

धक्कादायक: चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार

Crime News Suspicious of his character he stabbed his wife in the head

श्रीरामपूर | Crime News : श्रीरामपूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ७ मध्ये पुर्णावादनगर भागातील राहणाऱ्या गोपाल पाटील याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मासे कापण्याच्या कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. तिच्या डोक्यावर व पायावरती वार करून तिला गंभीररीत्या जखमी केले. तसेच लाथाबुक्याने मारहाण करीत शिवीगाळ करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गोपालची पत्नी लक्ष्मी हिने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News Suspicious of his character he stabbed his wife in the head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here