सहकारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शहांचा जोरदार हल्लाबोल
अहमदनगर | Ahmednagar News Today: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शहा आज प्रवरानगरमध्ये आले होते. प्रवरानगर येथे सहकार परिषद घेतली. अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय सहकार परिषदेत बोलताना भाजप नेते आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये एवढे मोठे घोटाळे कसे झाले? ते कोणी केले? याचा विचार करा, असे म्हणत अमित शहा यांनी पहिल्याच सहकार परिषदेत राज्यातील सहकार क्षेत्रातील नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
देशाच्या वाटचालीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असूनही स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत याचा देशपातळीवर विचार झाला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गरज ओळखून केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची सूत्रे माझ्याकडे सोपवली आहे.
महाराष्ट्रातील सहकारातील काही नेत्यांनी विविध शंका उपस्थित केल्या. परंतु आपण सहकार तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी आलो आहोत. माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्या नेत्यांनी आपण सहकारासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावं,’ अशा शब्दांत केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी टीका केली आहे.
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून ही परिषद झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते.
Web Title: Ahmednagar News Today Home Minister Amit Shah’s strong attack on the issue of corruption in co-operation