Home क्राईम Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील महिलेस मारहाण

Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील महिलेस मारहाण

Woman beaten in plateau area of ​​Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार येथे एका ३० वर्षीय महिलेस बाभळीचे काटे काढल्याच्या रागातून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लता गंगाराम केकाण वय ३० रा, हिवरगाव पठार या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.शनिवारी सकाळी सदर महिलेने बाभळीचे काटे काढल्याच्या रागातून चार जणानी महिलेस मारहाण केली आहे.  या फिर्यादीवरून सुनीता अर्जुन केकाण, अर्जुन भाऊसाहेब केकाण, करण अर्जुन केकाण, रोहिणी अर्जुन केकाण रा. हिवरगाव पठार ता. संगमनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहे.  

Web Title: Woman beaten in plateau area of ​​Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here