Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: दिराने भावजयीवर केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू, आरोपीस अटक

अहमदनगर ब्रेकिंग: दिराने भावजयीवर केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू, आरोपीस अटक

Woman killed in firing on Dira's brother-in-law

Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे भावजाईला गावठी कट्टा दाखवायच्या नादात आरोप दिर विशाल भालेराव कडून गोळीबार (firing) झाला आणि थेट भावजयी सुनीता संजय भालेराव वय ३२ वर्ष यांच्या डोक्यात शिरल्याने गंभीर जखमी झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता भालेराव यांना उपचारासाठी लोणी येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आरोपी विशाल भालेराव व त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले होते. पोलिसांनी आरोपी शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली होती.

शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे, दळवी आरोपींचा शोध घेण्यासाठी माहिती संकलित केली.

अखेर गोळीबार करणारा मुख्य आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करत आहे.

Web Title: Woman killed in firing on Dira’s brother-in-law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here